

राशिवडे : पुढारी वृत्तसेवा
फराळे ता. राधानगरी ओंकार शुगर कारखाना येथे ट्रॅक्टर अड्ड्यात एका ट्रॅक्टरचालकाने दुसऱ्या ट्रॅक्टरचालकाला धडक दिल्याने सोहेल मन्सूर पठाण (वय २२, रा. धरमनगरी, कौडगाव, जि. परभणी) या चालकाचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झालेली आहे. शुभम कॄष्णात चौगले रा.कावणे ता.करवीर या ट्रक्टरचालकावर गुन्हा नोंद झाला आहे.
दोन्ही ट्रक्टरचालक फराळे येथील ओंकार शुगरसाठी ऊसपुरवठा करतात. दोन्ही ट्रॅक्टर अड्ड्यात लावण्यात आले होते. त्यानंतर चौगले या ट्रक्टरचालकाने निष्काळजीपणाने ट्रॅक्टर चालवून अड्ड्यात असणारा दुसरा ट्रॅक्टरचालक पठाण यांना जोराची धडक दिली. त्यामुळे पठाण या चालकाचा जखमी होऊन मृत्यू झाला आहे. संशयित आरोपी ट्रॅक्टरचालक शुभम कृष्णात चौगले (रा. कावणे, ता. करवीर) याच्यावर गुन्हा नोंद झाला. या विषयी अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार कृष्णात खामकर व सूर्यवंशी करत आहेत.