Drowning Incident | रुई येथे पाण्याच्या टाकीत बुडून एकाचा मृत्यू

Drowning Incident |
Drowning Incident | रुई येथे पाण्याच्या टाकीत बुडून एकाचा मृत्यू File Photo
Published on
Updated on

हातकणंगले : रुई (ता. हातकणंगले) येथील पंचगंगा साखर कारखान्याच्या पाणी पुरवठा करणार्‍या लिफ्ट टाकीत बुडून अशोक नामदेव सुतार (वय ५५, रा. राजमाने हायस्कूलजवळ) यांचा मृत्यू झाला.

पंचगंगा साखर कारखान्यास पंचगंगा नदीतून नियमित पाणी पुरवठा केला जातो. नदी ते कारखाना हे अंतर जास्त असल्याने ते पाणी लिफ्ट करण्यासाठी रुई येथील राजमाने हायस्कूलजवळ जमिनीमध्ये पाणी साठा करण्यासाठी बांधीव पाण्याची टाकी बांधलेली आहे. अशोक सुतार हे त्याच परिसरात राहतातत. ते शुक्रवारी सायंकाळी घराजवळ असणार्‍या नातेवाईकाकडे जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. पण शनिवारी सकाळी पाण्याच्या टाकीत त्यांचा मृतदेह तरंगत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. सुतार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,मुलगी असा परिवार आहे. सुतार नेमके पाण्याच्या टाकीत कसे पडले याबबत मात्र नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास हातकणंगले पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news