18 Month Old Girl Death | दीड वर्षाच्या चिमुकलीचा इमारतीवरून पडून मृत्यू

Child Death
Child DeathPudhari
Published on: 
Updated on: 

आजरा : येथील गांधीनगर परिसरात दीड वर्षाच्या चिमुकलीचा बांधकाम सुरू असलेल्‍या इमारतीवरून पडून मृत्यू झाला. यचना भूकन निशाद (मूळ गाव मोंगाव, जि. कवरदा, छत्तीसगड, सध्या रा. गांधीनगर, आजरा) असे तिचे नाव आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

निशाद हे परप्रांतीय कुटुंब अनेक वर्षांपासून शहर व परिसरात बांधकामातून गुजराण करते. येथील गांधीनगरमध्‍येे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर खेळणारी यचना मंगळवारी तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झाली होती. तिला गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. प्राथमिक उपचार करून तिला जिल्हा रुग्णालय कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. बुधवारी तिचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.