kolhapur Murder Case | जुना वाद सोशल मीडियावर भडकला... रिक्षाचालकाचा गेम झाला; विक्रमनगरात पाच महिन्यांत तीन खून

एकमेकांना खुन्‍नस अन् थेट आव्हा‍न : विक्रमनगरात गॅंगवॉरमधून खून; वारंवारच्‍या घटनांमुळे परिसर हादरला
kolhapur Murder Case |
kolhapur Murder Case | जुना वाद सोशल मीडियावर भडकला... रिक्षाचालकाचा गेम झाला; विक्रमनगरात पाच महिन्यांत तीन खून Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : रिक्षाचालक सोहेब आणि त्याच्या मित्राने किरकोळ कारणातून संशयित आदित्य ओव्हळवर तीन महिन्यांपूर्वी चाकूहल्ला केला होता. या दोघांमधील वाद सोशल मीडियावर एकमेकांना खुन्‍नस अन् थेट आव्हा‍न देण्यापर्यंत पोहोचला होता. यातूनच आदित्यने सोहेबवर तीन महिन्यांपासून पाळत ठेवली अन् सोमवारी रात्री संधी साधून त्याचा गेम केला.

आदित्यच मास्टरमाईंड

आदित्यच सोहेबच्या खुनाचा मास्टरमाईंड असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने सोहेबवर पाळत ठेवण्याची जबाबदारी विक्रमनगर येथील आयुष माने याच्यावर दिली होती. आयुषने सोमवारी रात्री सोहेब आल्याचे सांगताच आदित्य अन्य चार साथीदारांसह सोहेबला संपविण्याच्या इराद्यानेच घटनास्थळी दाखल झाला.

डोळ्यावरच पहिला वार

तीन महिन्यांपूर्वी आदित्य आणि सोहेब यांच्यात वाद झाल्यानंतर सोहेबने आदित्यच्या पापणीवर आणि डोळ्यावर वार केला होता. हाच बदला आदित्यने सोमवारी घेत पहिल्यांदा सोहेबच्या डोळ्यावरच हल्ला केला.

घटनास्थळी रक्ताचे थारोळे अन्‌ बाटल्यांचा खच

सोहेबवर ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या ठिकाणी रक्ताचा सडा पडला होता. तसेच, घटनास्थळी दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता. पोलिस खुनातील मोटारी आणि हत्यारांचा शोध घेत आहेत.

विक्रमनगरात पाच महिन्यांत तीन खून

आईवरून शिवी दिल्याच्या रागातून विकास भोसले याचा ४ जानेवारी रोजी दगडाने ठेचून खून केला होता. याप्रकरणी ओंकार काळे याला जेरबंद केले आहे. मद्य प्राशन करून घरामध्ये धिंगाणा घालणाऱ्या जुनेद गफूर पठाण (वय २२) याचा २२ एप्रिल रोजी बापानेच खून केला होता. याप्रकरणी गफूर सुलतान पठाण याला पोलिसांनी अटक केली होती. यानंतर सोमवारी (दि. ८) रात्री गँगवाॅरमधून झालेल्या खुनाच्या घटनेनंतर विक्रमनगर परिसर हादरून गेला आहे. सोमवारच्या घटनेमुळे विक्रमनगर परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news