Hotel Kitchen Fire | तेलाचा भडका उडून हॉटेलमधील किचनला आग

कोल्हापूर : आगीच्या भडक्यामुळे किचनमधील साहित्य जळून खाक झाले.
कोल्हापूर : आगीच्या भडक्यामुळे किचनमधील साहित्य जळून खाक झाले. (छाया : नाज ट्रेनर)
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये तेलाचा भडका उडून हॉटेलच्या किचनला आग लागली. यामध्ये गॅसभट्टी, चिमणी, डक्टसोबत किचनमधील वायरींग आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने एक लाख रुपयांचे नुकसान झाले. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.

मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका हॉटेलच्या किचनमध्ये गुरुवारी सायंकाळी तेलाचा भडका उडून आग लागली. काही क्षणातच आगीचे व धुराचे लोट हॉटेलच्या चिमणीतून बाहेर पडत होते. हॉटेलच्या व्यवस्थापनाने याची माहिती अग्निशमन दलास दिली. काही क्षणातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. किचनमधील अनेक वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. अर्धा तासाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.

कुरुंदवाडमधून २६ गॅस सिलिंडर लंपास

कुरुंदवाड : कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील नांदणी रस्त्यावरील त्रिवेणी भारत गॅस गोडाऊनमधून कटरच्या साहाय्याने पत्रा उचकटून २६ गॅस सिलिंडर चोरट्यांनी लंपास केले. या सिलिंडरची अंदाजे किंमत ७० हजार रुपये असून, याप्रकरणी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गोडाऊनचे कर्मचारी चंद्रकांत महावीर कागे (वय ३५, रा. तेरवाड, ता. शिरोळ) यांनी फिर्याद दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.