

कोल्हापूर : सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर हे आंदोलन आहे. कोल्हापुरात गुरुवारपासून सीपीआर येथे परिचारिकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्याने परिचारिकांनी शुक्रवारपासून बेमुदत आंदोलनाचा निर्णय घेतला.
या आंदोनात सीपीआरमधील सुमारे 400 परिचारिका सहभागी झाल्या आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाबाहेर आंदोलकांनी ठिय्या मांडला होता. परिचारिका संपावर गेल्याने सीपीआरची आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. सीपीआर प्रशासनाने नर्सिंगचे शिक्षण घेणार्या आणि कंत्राटी परिचारिकांवर रुग्णसेवा सुरू ठेवली आहे. सीपीआर येथे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा कोल्हापूरच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करून जोरदार निदर्शने केली.
यावेळी योगेश यादव, मनुजा रेणके, विमल कुलकुटकी, पल्लवी रेनके, मानसी मुळे, दत्ता ऐवळे, रेश्मा गायकवाड, विनोद पवार, सॅमसन कुरणे, अभिजित कावळे, निहारिका हुपरीकर, गिरीश घोरपडे, जाई चव्हाण, जॉय येमल, विराट चव्हाण, वियज परमार, विजय आढाव यांच्यासह संघटेनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.