Tawde Hotel Area Illegal Constructions | तावडे हॉटेल परिसरातील बांधकामाबाबत बेकायदेशीर काम होणार नाही : महापौर

वरिष्ठांचा आदेश आल्यास महापौरपदाचा राजीनामा देण्याची तयारी
Tawde Hotel Area Illegal Constructions |
Tawde Hotel Area Illegal Constructions | तावडे हॉटेल परिसरातील बांधकामाबाबत बेकायदेशीर काम होणार नाही : महापौर
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील बांधकामांच्या विषयावर शहरात उलटसुलट चर्चा सुरू असली, तरी कायद्याच्या चौकटीत राहूनच याबाबत निर्णय घेतला जाईल. कोणतेही बेकायदेशीर काम केले जाणार नाही, असे महापौर रूपाराणी निकम यांनी सोमवारी (दि. २३) स्पष्ट केले.

गार्डन्स क्लब आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. तावडे हॉटेल परिसरातील विषय न्यायप्रविष्ट असून न्यायालयाच्या सूचनेनुसार प्रशासनाने तो महासभेसमोर ठेवला आहे. या विषयावर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा असल्याने महिन्याभरात निर्णय घ्यावा लागणार आहे.

मागील महासभा तावडे हॉटेल परिसरातील बांधकामावरूनच तहकूब केल्याचा आरोप होत असल्याबाबत विचारले असता, महापौर निकम म्हणाल्या, महासभेत अनेक विषय असतात. त्यावर उलटसुलट चर्चा होत असते. शहरातील अन्य प्रलंबित प्रश्नांमुळे सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला होता.

वरिष्ठांचा आदेश अंतिम; राजीनामाही देणार!

महापौरपदाचा कार्यकाळ निश्चित असतो. मिळालेल्या कालावधीत केलेल्या कामाबाबत आपण समाधानी आहोत. आणखी कालावधी मिळाल्यास सुरू असलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करता येतील आणि शहराच्या विकासासाठी अधिक काम करता येईल. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा देण्यास सांगितल्यास आपण तातडीने राजीनामा देऊ. वरिष्ठांचा आदेश आपल्यासाठी अंतिम असेल, असेही महापौर निकम यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.