राजर्षी शाहू महाराजांचे नवे तैलचित्र

शाहू जन्मगृहात अनावरण; शतकोत्तर सुवर्ण जयंतीचे औचित्य
New oil painting of Rajarshi Shahu Maharaj
शाहू जन्मस्थळी राजर्षी शाहू महाराजांचे तैलचित्र रविवारी लावण्यात आले.Pudhari File Photo

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीचे औचित्य साधून ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ या शाहू जन्मस्थळी राजर्षी शाहू महाराजांचे कोल्हापुरातील उदयोन्मुख कलाकाराने रेखाटलेले तैलचित्र बसविण्यात आले आहे. रविवारी रात्री उशिरा मूळ जन्म गृहामध्ये हे तैलचित्र लावण्यात आले.

शाहू जन्मस्थळी जन्मगृहामध्ये यापूर्वी आठ बाय पाच फूट आकाराचे कॅनवास प्रिंट लावण्यात आले होते. शतकोत्तर सुवर्ण जयंतीचे औचित्य साधून या ठिकाणी तैलचित्र बसवण्याचा निर्णय पुरातत्त्व विभागाने घेतला. त्यानुसार कोल्हापुरातील उदयोन्मुख कलाकार केतन पायमल याने सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नातून जुन्या संदर्भाच्या आधारावर पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली हे तैलचित्र तयार केले.

New oil painting of Rajarshi Shahu Maharaj
राजर्षी शाहू, बाबासाहेबांच्या स्मारकासाठी १९९ कोटी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

26 जून रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शतकोत्तर सुवर्ण जयंती आहे. याचे औचित्य साधून पायमल या कलाकाराने साकारलेले तैलचित्र रविवारी रात्री उशिरा जन्मस्थळातील जन्मगृहामध्ये लावण्यात आले. सोमवारपासून हे तैलचित्र शाहूप्रेमींना पाहण्यासाठी खुले होणार आहे.

कोल्हापुरातील केतन पायमल या संवेदनशील उदयोन्मुख कलाकाराला सहा महिन्यांपूर्वी शाहू महाराजांच्या जन्मगृहातील तैलचित्र बनवण्याची संधी दिली. गेल्या सहा महिन्यांत अनेक वेळा त्याचे काम सुरू असताना परीक्षण केले. त्याला योग्य त्या सूचना दिल्या. रविवारी हे तैलचित्र शाहू जन्मस्थळी बसविण्यात आले आहे.
उदय सुर्वे (उपवेक्षक, पुरातत्त्व विभाग)
राजर्षी शाहू महाराजांनी कलाकार, चित्रकारांसाठी जे काही केले ते माझ्या नेहमी स्मरणात राहिले आहे. तोच माझा प्रेरणास्रोत राहिला आहे. जन्मस्थळातील कोणतेही काम करायचे असा मी निश्चय केला होता. जन्मगृहातील शाहू महाराजांच्या मूळ उंचीइतके तैलचित्र बनवण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी कृतज्ञ आहे.
केतन पायमल (उदयोन्मुख कलाकार)
New oil painting of Rajarshi Shahu Maharaj
राजर्षी शाहू महाराज : हरित क्रांतीचे जनक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news