

कोल्हापूर : नवोदित वकिलांनी न्यायालयीन शिस्त, संविधानिक ज्ञान व युक्तिवाद कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन सर्किट बेंच कार्यशाळेत करण्यात आले.
कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू होत असल्याच्या निमित्ताने ‘पुढारी’ माध्यम समूह, शहाजी लॉ कॉलेज, खंडपीठ कृती समितीच्या वतीने ‘उच्च न्यायालयामधील वकिली संधी आणि आव्हाने’ या विषयावर कार्यशाळा झाली. याचे उद्घाटन कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम यांच्या हस्ते झाले.
यावेळी वकील आणि विधीच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. संस्थेचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी प्रास्ताविक केले. शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील यांनी शहाजी लॉ कॉलेजच्या निर्मितीचा इतिहास व कार्यशाळेबद्दल माहिती दिली. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अॅड. डॉ. संतोष शहा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सदस्य अॅड. वैभव पेडणेकर, प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी व प्राचार्य डॉ. यू. आर. पाटील यांच्यासह माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. इंद्रजित चव्हाण, सचिव अॅड. शिवप्रसाद वंदुरे-पाटील उपस्थित होते. प्रा. सुहास पत्की व डॉ. अतुल जाधव यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. सहायक प्रा. पिनाझ सनदी, सहायक प्रा. सादिया मुल्ला, सहायक प्रा. श्वेता गुंडाळे यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. चेतन शिंदे यांनी आभार मानले.
या कार्यशाळेचा यूट्यूब लिंकवरून सुमारे 3200 जणांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग घेतला.
उच्च न्यायालयात जनहित याचिका टाकण्याचा अधिकार आहे. परंतु, ही याचिका दाखल करताना कुणाचे नुकसान, बदनामी, अडवणूक होणार नाही, याची वकिलांची दक्षता घ्यावी. जनहित याचिका हे ब्रम्हास्त्र असून त्याचा योग्य पद्धतीने वापर व्हावा, असे अॅड. नरवणकर म्हणाले.