Rajesh Patil | गोकुळची बदनामी चांगल्‍या कामातून पुसून काढणार

राष्‍ट्रवादी दुष्‍काळ आढावा बैठकीत सत्‍कार
कोल्‍हापूर : राष्‍ट्रवादीच्‍या दुष्‍काळ आढावा बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्‍या हस्‍ते गोकुळचे नूतन अध्‍यक्ष राजेश पाटील यांचा पक्षातर्फे सत्‍कार करण्‍यात आला.
कोल्‍हापूर : राष्‍ट्रवादीच्‍या दुष्‍काळ आढावा बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्‍या हस्‍ते गोकुळचे नूतन अध्‍यक्ष राजेश पाटील यांचा पक्षातर्फे सत्‍कार करण्‍यात आला. (छाया : मिलन मकानदार)
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : निवडणुकीदरम्‍यान गोकुळची कशा पद्धतीने बदनामी झाली हे सर्वांनी पाहिले आहे. आता चांगल्‍या कामातून गोकुळची झालेली बदनामी पुसून काढण्‍यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याचे नूतन अध्‍यक्ष राजेश पाटील यांनी राष्‍ट्रवादीच्‍या दुष्‍काळ आढावा बैठकीदरम्‍यान झालेल्‍या सत्‍काराला उत्तर देताना सांगितले. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनीही, गोकुळमध्‍ये राष्‍ट्रवादीचा अध्‍यक्ष झाला आहे. आता २५ लाख लिटर संकलन करून दाखवा, असे आवाहन संचालकांना केले.

बाजार समितीमधील राष्‍ट्रवादीच्‍या जिल्‍हा व शहर कार्यालयात शनिवारी प्रमुख नेते पदाधिकारी यांची बैठक झाली. बैठकीदरम्‍यान मंत्री मुश्रीफ यांच्‍या हस्‍ते अध्‍यक्ष राजेश पाटील यांचा सत्‍कार झाला. यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, गोकुळमध्‍ये अध्‍यक्ष निवडीसाठी डेडलॉक निर्माण झाल्‍याने शासननियुक्‍त संचालक नियुक्‍त करण्‍याशिवाय पर्याय नव्‍हता. आता महायुतीचा अध्‍यक्ष झाला आहे. शासननियुक्‍त संचालक नियुक्‍तीबाबत न्‍यायालयात सुनावणी सुरू आहे. त्‍यामुळे याबाबत आता काही बोलणार नाही. संचालकांनी चांगले करत दूध उत्‍पादक शेतकर्‍यांना दिलेल्‍या आश्‍वासनानुसार पाच वर्षांत वीस रुपये दरवाढ देण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत.

तर पाच वर्षे कट्ट्यावर बसला असता

बैठक सुरू झाल्‍यानंतर गोकुळचे अध्‍यक्ष राजेश पाटील यांच्‍यासह संचालक बैठकीच्‍या ठिकाणी आले. संचालक येताच माजी आ. के. पी. पाटील यांनी संचालक राहुल पाटील यांचे अभिनंदन केले. तसेच मुश्रीफ यांच्यामुळे सत्तेत गेला, नाहीतर पाच वर्षे कट्ट्यावर बसला असता, असा टोला लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.