Crime News | भाच्याने केला मामावर कोयत्याने हल्ला

आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून घटना
Crime News
Crime News | भाच्याने केला मामावर कोयत्याने हल्ला file photo
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : दारूच्या नशेत आईला मारहाण करून शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून भाच्याने मामाच्या डोक्यात थेट कोयत्याने हल्ला केला. यामध्ये सागर अशोक माने (वय ३५) हे जखमी झाले. गुरुवारी रात्री संभाजीनगरातील गजानन महाराज नगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी रुद्र प्रशांत तोरणे (वय १९, रा. मंडलिक वसाहत) याच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

संशयित रुद्र तोरणे याला दारूचे व्यसन आहे. तो वारंवार आईला मारहाण करून शिवीगाळ करत असतो. यास कंटाळून रेश्मा तोरणे या १५ दिवसांपासून माहेरी राहण्यास गेल्या होत्या. गुरुवारी रात्री रुद्र तोरणे त्याचा मामा सागर माने यांच्या घरासमोर आला. आईने घरी येण्यास नकार दिल्याने रुद्रने आईला शिवीगाळ व मारहाण सुरू केली. यावेळी मामा सागर माने हा भांडण सोडविण्यास गेला असता संशयिताने सोबत आणलेल्या कोयत्याने मामाच्या डोक्यात वर्मी घाव घातला. रक्तबंबाळ झालेल्या माने यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. जुना राजवाडा पोलिसांनी संशयित रुद्र तोरणेला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.