Kolhapur ZP: राष्ट्रवादीच ठरला मोठा भाऊ

जिल्हा परिषदेत अखेर महायुतीमध्ये समझोता, चारही पक्षांना मिळणार अध्यक्षपदाचा मान
Kolhapur ZP
Kolhapur ZP: राष्ट्रवादीच ठरला मोठा भाऊKolhapur
Published on
Updated on
डॅनियल काळे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत मोठा भाऊ कोण यावरून महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेली महिनाभर सुरू असलेला संघर्ष अखेर संपला. सर्वाधिक जागा मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेससलाच पहिल्या सव्वा वर्षासाठी अध्यक्षपद देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आणि जिल्हा परिषद सत्तेतील महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ ठरला.

दरम्यान पुढील सव्वा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच जिल्हा परिषदेत मोठा भाऊ ठरला आहे. पदाधिकारी निवडीच्या या राजकारणाला ‌‘गोकुळ‌’च्या निवडणुकीची किनार असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषदेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून महायुतीच्या घटक पक्ष व आघाडीतील घटकांना मिळून 51 जागा मिळाल्या आहेत.

याउलट महाविकास आघाडीला 17 जागा मिळाल्या आहेत. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदावरून महायुतीमध्ये सुरू झालेला संघर्ष रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर संपला. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना व महायुतीतील इतर पक्षांना मिळून सवा वर्षासाठी हे पद देण्याचा तोडगा निघाला. सर्वच घटक पक्षांनी त्याला मान्यता दिली आहे. तूर्त जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news