Sarpirajirao Lake : मुरगूडचा सरपिराजीराव तलाव जूनमध्येच ओव्हरफ्लो !

प्रथमच लवकर भरला तलाव
Sarpirajirao Lake
Sarpirajirao Lake : मुरगूडचा सरपिराजीराव तलाव जूनमध्येच ओव्हरफ्लो !ओसंडून वाहाणारा मुरगूडचा सरपिराजीराव तलाव '
Published on
Updated on

Murgud's Sarpirajirao Lake overflows

मुरगूड : पुढारी वृत्तसेवा

मुरगूड शहरासह शिंदेवाडी व यमगे गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणारा सरपिराजीराव तलाव आज पहाटे पूर्ण क्षमतेने भरुन ओसंडून वाहू लागला आहे. चालू वर्षी जोराच्या पावसाने प्रथमच जूनमध्ये हा तलाव भरला.

Sarpirajirao Lake
kolhapur | कारागृहात पुरविण्यात येणार्‍या साहित्यात 500 कोटींचा घोटाळा

मागील वर्षी २३ जुलैला हा तलाव भरला होता. तर सन २०२३ मध्ये १५ जुलै रोजी हा तलाव भरला होता. १०२ वर्षात हा तलाव ९७ वेळा पूर्ण क्षमतेने भरला. या वर्षी पाऊस सुरु झाल्यानंतर पंधरा दिवसातच तलाव पूर्ण क्षमतेने भरल्‍याने नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे.

संस्थानकाळात बांधलेल्या सरपिराजीराव तलावाने आपल्या अखंडीत १०२ वर्षाच्या आयुष्यात अखंड व स्वच्छ पाणीपुरवठा मुरगूडसह तीन गावांना केला. या तलावाचा परिघ सुमारे तीन चौऱ़स मैल असून १२० एकरात ३८ फूट उंचीने १० कोटी २२ लाख १९ हजार ९८० घनफूट इतका पाणीसाठा या तलावात होतो. या तलावातून मुरगूडशहरासाठी दररोज सुमारे १० ते २० लाख लिटर पाण्याचा पुरवठा होतो. या शिवाय शिंदेवाडी आणि यमगे या गावांना पिण्यासाठी आणि २२५ एकर शेतीला लाखो लिटर पाणीपुरवठा होतो.

Sarpirajirao Lake
World Yoga Day 2025 |योगा थेरपीने उच्च रक्तदाब नियंत्रणात!

यावर्षी मुरगूड नगरपालिकेने वेदगंगा नदीतून शहरासाठी पिण्याचा पाणीपुरवठा ५० टक्के व सरपिराजीराव तलावातून ५० टक्के केल्याने तलावात शिल्लक पाणीसाठा जास्त होता. त्यामुळेच हा तलाव पूर्णक्षमतेने लवकर भरला. सरपिराजीराव तलाव आपली निर्धारीत ३८.३ फुटाची पाणी पातळी पार करत ओसंडून वाहत आहे.

जूनमध्ये तलाव भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षीपेक्षा एक महिना अगोदर ( २१ जून ) भरल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. भरलेला तलाव पाहाण्यासाठी उत्साही नागरिकांची तलाव काठावर गर्दी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news