Bhadgaon murder Case
kolhapur | प्रेमाचा बनाव, लग्नाचा डाव; प्रेयसीच्या खुनाने हादरले गाव

kolhapur | प्रेमाचा बनाव, लग्नाचा डाव; प्रेयसीच्या खुनाने हादरले गाव

गडहिंग्लज तालुक्यातील भडगावात अनैतिक संबंधातून खुनाचा थरार
Published on

दिलीप भिसे

कोल्हापूर : प्रवीण... तरणा बांड... परिस्थिती बेताची, तरीही कमावलेली शरीरयष्टी... गवंडी काम करून स्वत:चा उदरनिर्वाह करत होता. सुनीता (वय 40) हिच्याशी त्याची तोंडओळख झाली. दोघांच्या नजरा एकमेकाला भिडल्या... दोघेही समवयस्क... ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले... आणाभाका झाल्या... आयुष्यभर सांभाळण्याचं त्यानं तिला वचन दिलं. झालं... काळ लोटला... प्रवीणने गुपचूप लग्न केलं... सुनीताला आयुष्यातून बाजूला करून त्यानं संसार थाटला. प्रेमभंग झाल्याने तिचा आकांडतांडव सुरू झाला अन् मग काय... तुझा संसार उद्ध्वस्तच करतो, अशी धमकी तिने दिल्यानंतर मात्र प्रवीण हडबडला... त्यानं तिला निर्जन स्थळी, जंगलात भेटीचा निरोप दिला... प्रेमाचं ढोंग करीत त्यानं गळा घोटून तिला खल्लासच केली...

गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव... साडेचार-पाच हजार लोकवस्तीचं गाव... दि.11 फेब—ुवारीला तालुक्यातील महागाव हद्दीत मठपती यांच्या शेतालगत निर्जन ठिकाण असलेल्या घंटीचा झरा नावाच्या ओढ्यामध्ये एका 35 ते 40 वर्षीय अनोळखी महिलेचा चेहरा, डावा हात आणि कमरेखालचा भाग नसलेला मृतदेह आढळून आला. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला असावा, अशीच काहीशी घटनास्थळाची परिस्थिती... मृतदेहाच्या अंगावरील कपडे, हातातील बांगड्या, चप्पल, उजव्या हातातील बेटेंक्सच्या पाटल्या यावरून महिलेची ओळख पटली.

तपासातील प्रश्नचिन्ह अन्दा गिन्यासह गायब मोबाईलचे गूढ

भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील सुनीता संजय केसरकर (वय 40) असे मृत महिलेचे नाव निष्पन्न झाले. सुनिता विवाहित असून तिला मुलगा आहे. पतीसमवेत तिचे भडगावला वास्तव्य होते. सुनिताची घरची स्थिती गरिबीची असल्याने ती देखिल मजुरी करीत...पण सुनिताचा गावापासून काही अंतरावर असलेल्या महागाव येथील निर्जन ठिकाणी मृत्यूबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तिच्या वापरातील मोबाईल, अंगावरील सोन्याचे दागिनेही गायब... संशय बळावला...पती, मुलासह नातेवाईकांनाही वन्यप्राण्यानी केलेल्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली. गडहिग्लज पोलिसांनी पंचनामा केला. घटनास्थळी उत्तरणीय तपासणी झाली. मृतदेहावर अत्यंसंस्कार झाले...

पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर प्रियकरचा सुगावा !

महागाव येथील निर्जन ओढ्यात विचित्र अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाबद्दल पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांना संशय आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांची तपासाची चक्रे गतीमान झाली...सुनिताचा पती, मुलगा अन्य नातेवाईकांकडूनही माहिती घेण्याचा प्रयत्न झाला. पण सुगावा लागत नव्हता...चौकशी पथकाच्या अथक प्रयत्नानंतर भडगाव येथील प्रविण चंद्रकांत चिंचेवाडी ( वय 34) यांचा नाव पुढे आले. पथकाने त्याचा शोध सुरू केला.पण त्याच्या वापरातील मोबाईल बंद... शिवाय तो काही दिवसापासून गावातून गायब झाल्याचे निदर्शनास आले. पथकाची चौकशीची आणि तपासाची व्याप्ती वाढविली. प्रविण पोलिसांच्या हाताला लागला.

पोलिसी खाक्यानंतर संशयिताने तोंड उघडले... मृत्यूच्या बनावाचा कट !

पोलिसांनी प्रश्नाचा भडीमार सुरू केला. एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे पोलिसांशी दुरूत्तरे करू लागला. तपासाची दिशाच बदलण्याचा प्रयत्न करणार्‍या संशयिताला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने तोंड उघडले... महिलेचा खुन करून वन्यप्राण्याच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याच्या बनावाचा कट रचल्याची त्याने कबुली दिली.

प्रेमाचे नाटक करीत प्रविणने सुनिताचा गळा घोटला !

प्रविण हडबडला... भेदरला... सुनिताने भांडाफोड केल्यास भरलेला संसार उध्वस्त होणार, या भितीने त्याने सुनिता हिचा कायमचा काटा काढण्याचा बेत रचला. तिच्याशी संपर्क साधला... प्रेमाचा साक्षात्कार केला.अन दि.18 जानेवारीला सायंकाळी तिला भेटायला बोलाविले. दोघेही मोटारसायकलीवरून महागाव हद्दीतील निर्जन ठिकाणी आले. प्रेमाचे नाटक करत त्याने सुनिताचा गळा घोटून मृतदेह ओढ्यात फेकून दिला. दागिने काढून घेतले. मोबाईल हिरण्यकेशी नदीजवळ झुडूपात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाणसह पथकाने पुरावा नसताना अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंत करणार्‍या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करून मारेकर्‍याला कोठडीचा रस्ता दाखविला.

सहा वर्षे प्रेमाचा खेळ अन् उडविला लग्नाचा बार!

प्रवीण अविवाहित, तर सुनीता विवाहित. दोघांची ओळख झाली. नजरेला नजर लागू लागली. दोघेही एकमेकांच्या मनात भरले. सहा वर्षांपासून त्यांच्यात प्रेमाचा खेळ सुरू होता. सायंकाळी कामावरून घराकडे परतताना निर्जन ठिकाणी दोघांच्या हमखास भेठीगाठी... संशय येणार नाही, याची दोघेही दक्षता घेत. सारं काही आलबेल सुरू असतानाच प्रवीणने स्वत:च्या लग्नाचा बार उडविला. प्रवीणचे लग्न झाल्याचे समजताच दोघांत वाद सुरू झाला; मात्र प्रवीणने ‘तुला आयुष्यभर सांभाळण्याचे’ वचन दिल्यानंतर वाद शमला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news