Municipal officer bribe case | मनपा ‘अतिक्रमण’चा पथकप्रमुख दोन हजारांची लाच घेताना जेरबंद

Municipal officer bribe case |
Municipal officer bribe case | मनपा ‘अतिक्रमण’चा पथकप्रमुख दोन हजारांची लाच घेताना जेरबंद
Published on
Updated on

कोल्हापूर : महापालिका, बाजारगेट परिसरात स्टॉल लावणार्‍या विक्रेत्याला कारवाईचा धाक दाखवून त्याच्याकडून दोन हजार रुपयांची लाच उकळणार्‍या कोल्हापूर महापालिकेचा इस्टेट ऑफिसर तथा अतिक्रमण निर्मूलन पथकाचा प्रमुख विलास शामराव साळोखे (वय 55, रा. संत सेना महाराजनगर, कोल्हापूर) याला मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ जेरबंद करण्यात आले. विक्रेत्याकडून हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध पथकाने कारवाई केली.

सतत वर्दळ असलेल्या बाजारगेट परिसरात कारवाई झाल्याने महापालिका परिसरात खळबळ उडाली होती. पथकाने संशयित साळोखे याची तत्काळ झडती घेऊन दुचाकीसह पिशवीतील लाच स्वरूपात स्वीकारलेली दोन हजार रुपयाची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. संशयिताविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा त्यास अटक करण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंध पथकाच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी सांगितले.

रंगपंचमीच्या उत्सवासाठी तक्रारदार विक्रेत्याने महापालिकेच्या पिछाडीस बाजारगेट परिसरात किरकोळ रंग विक्रीचा स्टॉल मांडला होता. महापालिका अतिक्रमण विभागीय पथकाचा अतिरिक्त पदभार असलेल्या विलास साळोखे याने संबंधित विक्रेत्याला बाजारगेट परिसरात अतिक्रमण केल्याने साहित्य जप्तीचा इशारा दिला होता. कारवाई टाळण्यासाठी तसेच स्टॉल लावायचा झाल्यास पंधराशे रुपये द्यावे लागतील, असे धमकाविले होते.

पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट

साळोखे याच्याकडून होणार्‍या पिळवणुकीमुळे हैराण झालेल्या विक्रेत्याने लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्याशी संपर्क साधून साळोखे याच्याविरूध्द तक्रार दाखल केली होती. पथकातील अधिकार्‍यांनी मंगळवारी पंचाद्वारे तक्रारीची पडताळणी केली. यावेळी साळोखे याने 1500 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.

संशयिताच्या घराची झडती

सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास बाजारगेट परिसरात विक्रेत्याकडून दोन हजारांची लाच स्वीकारताना साळोखे याला पथकाने रंगेहाथ पकडले. संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा संशयिताच्या घराची झडतीही घेण्यात आल्याचे उपअधीक्षक पाटील यांनी सांगितले. बुधवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news