

कोल्हापूर : महापालिकेच्या पाण्याचे दर वाढणार आहेत. १ ऑक्टोबरपासून दरवाढ लागू होणार असून १ नोव्हेंबरपासून नागरिकांना वाढीव बिले मिळतील. वार्षिक सुमारे ३० कोटी उत्पन्न अपेक्षित असून ही रक्कम पाणीपुरवठा विभागाच्या आधुनिकीकरणासाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर रूपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
उत्पन्न ४५ कोटी अन् खर्च ११० कोटी...
महापौर निकम व आयुक्त डॉ. भारूड म्हणाले, गेल्या काही वर्षांत वीज बिलासह जलसंपदाच्या पाण्याच्या दरात अनेक पटीने वाढ झाली आहे. शहराची पाणीपुरवठा योजना जुनी असल्याने मेंटेनन्सवर खर्च करावा लागत आहे. महापालिकेला वर्षाला पाणीपुरवठा विभागातून ४० ते ४५ कोटी मिळत आहेत. मात्र, खर्च तब्बल ११० कोटींवर गेला आहे. परिणामी, दरवाढ करणे अपरिहार्य आहे. शहर वासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेता मुरलीधर जाधव, शिवसेना गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेवक अश्किन आजरेकर, जल अभियंता हर्षजित घाटगे उपस्थित होते.
ग्रामीण भागापेक्षा कमी पाणी दर...
कोल्हापूर शहर परिसरातील ग्रामीण भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. निवासी वापर ० ते २० हजार लि. साठी २४.२० रु., २१ हजार ते ३० हजार लि. ३०.२५ रु., ३१ ते ४० हजार लि. ३६.३० रु., ४१ ते ६० हजार लि. ४२.३५ रु., ६० हजार, लि. च्या पुढे ४८.४० रु., व्यावसायिक वापर ० ते २० हजार लि. ४३ रु., २१ हजार ते ३० हजार लि. ४९ रु. ३१ ते ४० हजार लि. ६७.५० रु. असे दर आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या पाण्याचे दर त्या तुलनेत अत्यंत नगण्य असल्याचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी सांगितले.
सध्याचे पाण्याचे दर
निवासी
० ते २० हजार लि. : ९.५० रु.
२१ हजार लि. ते ४० हजार लि. : १२.६५ रु.
४० हजार लिटरच्या पुढे : १८ रु.
व्यावसायिक
प्रती. कि. लि. ४६ रु.
औद्योगिक
प्रती कि. लि. ७४.७५ रु.
नवीन दरवाढ अशी...
० ते २० हजार लि.
निवासी - १५ रु.
व्यावसायिक - ५८ रु.
औद्योगिक - ९० रु.
२०००१ ते ३० हजार लि.
निवासी - २० रु.
व्यावसायिक - ५८ रु.
औद्योगिक - ९० रु.
३०००१ ते ४० हजार लि.
निवासी - २२ रु.
व्यावसायिक ५८ रु.
औद्योगिक - ९० रु.
४०००१ ते ६०००० लि.
निवासी - २६ रु.
व्यावसायिक - ६५ रु.
औद्योगिक - ९४ रु.
६०००१ ते ८०००० हजार लि.
निवासी - ३० रु.
व्यावसायिक - ६५ रु.
औद्योगिक - ९४ रु.
८०००१ ते १ लाख लि.
निवासी - ३६ रु.
व्यावसायिक ७० रु.
औद्योगिक - ११२ रु.
१ लाखाच्या पुढे लि.
निवासी - ३६ रु.
व्यावसायिक - ७० रु.
औद्योगिक - ११२ रु.