Mumbai Kolhapur Koyna Express | चालकाला समजलेच नाही, गांधीनगरात न थांबताच ‘कोयना’ कोल्हापुरात

गुरुवारी रात्रीचा प्रकार; प्रवाशांचा उडाला गोंधळ
Mumbai Kolhapur Koyna Express
Mumbai Kolhapur Koyna Express | चालकाला समजलेच नाही, गांधीनगरात न थांबताच ‘कोयना’ कोल्हापुरातPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस गांधीनगर स्थानकात थांबली नाही. चालकाला रेल्वे थांबवायची आहे, हे पुढे आल्यानंतर समजले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. यामुळे ही गाडी थेट कोल्हापूर स्थानकात आली. गुरुवारी (दि.18) रात्री घडलेल्या या प्रकाराने प्रवाशांचा मात्र गोंधळ उडाला.

मुंबईहून कोल्हापूरला येणारी कोयना एक्स्प्रेस रात्री सव्वाआठच्या सुमारास गांधीनगर स्थानकाजवळ आली. मात्र, ही गाडी स्थानकात थांबलीच नाही. एक्स्प्रेस गाड्यांचा गांधीनगरचा थांबा रद्द केला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोयना एक्स्प्रेसला गांधीनगरचा थांबा पूर्ववत सुरू केला आहे, तरीही गुरुवारी रात्री ही गाडी थांबली नाही.

कोयना एक्स्प्रेसला गांधीनगरात थांबा दिल्याने कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसचे गांधीनगरातील प्रवासी कोयना एक्स्प्रेसने कोल्हापुरात येतात. यानंतर रात्री 8 वाजून 55 मिनिटांनी सुटणार्‍या कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसने रवाना होतात. गुरुवारीही महालक्ष्मी एक्स्प्रेसचे अनेक प्रवासी कोयना एक्स्प्रेससाठी गांधीनगर स्थानकात थांबले होते. मात्र, कोयना न थांबल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. बस, रिक्षा अथवा खासगी वाहनानेही कोल्हापूर स्थानक गाठून महालक्ष्मी एक्स्प्रेस पकडणे शक्य नसल्याने प्रवाशांनी महालक्ष्मी एक्स्प्रेसच अडवण्याचा इशारा दिला. यानंतर रेल्वे प्रशासनाने गांधीनगर स्थानकात महालक्ष्मी एक्स्प्रेस थांबवली. प्रवाशांना घेऊन ही गाडी मुंबईकडे रवाना झाली. दरम्यान, कोयना एक्स्प्रेसच्या चालकाला या गाडीला थांबा दिल्याची माहिती न मिळाल्याने हा प्रकार घडल्याचा खुलासा रेल्वेने केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news