

तानाजी खोत
कोल्हापूर : नोकरीच्या बाजारात एआयमुळे मोठे फेरबदल होत असून, कोल्हापूरच्या शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात त्याचे पडसाद उमटत आहेत. आयटी सॉफ्टवेअर आणि कोडिंग क्षेत्रातील संधी आता कमी झाल्या आहेत. मॅन्युफॅक्चरिंग, फार्मा, डिफेन्स यांसारख्या अधिक तांत्रिक-शाश्वत क्षेत्राकडे आश्वासक पर्याय म्हणून पाहिले जात आहे. केवळ पदवीपेक्षा ‘मल्टी-डिसिप्लिनरी’ (बहुशाखीय) कौशल्यांचा बोलबाला कॅम्पसमध्ये वाढला आहे. सध्या फाऊंड्री आणि इंजिनिअरिंग पट्ट्यात ‘स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग’चे युग सुरू झाले आहे. केंद्राच्या ‘आत्मनिर्भर’ धोरणामुळे स्थानिक उद्योगांना संरक्षण क्षेत्रातील कंत्राटे मिळत आहेत.
फार्मास्युटिकल क्षेत्रात सध्या मोठी तेजी असून, संशोधकांसाठी परदेशात आणि स्थानिक स्टार्टअप्समध्ये संशोधनाच्या दर्जेदार संधी निर्माण झाल्या आहेत. कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञान आणि डेटा अॅनालिटिक्सचा वापर करणार्या ‘अॅग्रो-आयटी’ या नव्या ट्रेंडलाही तरुण पसंती देत आहेत.
कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सध्या ‘ए-ग्रेड’ कॉलेजेसमध्ये मोठ्या कंपन्या येत आहेत, मात्र अनेक ठिकाणी ‘थर्ड पार्टी’ रिक्रूटमेंट एजन्सींचा सुळसुळाट आहे. जागेवर दिली जाणारी ऑफर प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपातील तफावत यामुळे ही विद्यार्थी तीन महिन्यांतच नोकरी सोडून पुन्हा कौशल्य वाढवण्यावर भर देताहेत.
करिअर पर्याय : असा आहे सध्याचा ट्रेंड
उच्च वेतन (7-10 लाख) 7 ते 10 %
स्टार्टअप्स : 3 ते 5 (अॅग्रो-टेक आणि इंडस्ट्रियल स्टार्टअप्स).
परदेशातील संधी : 5 ते 8 %
उच्च शिक्षण : 15 ते 20 (जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सिंगापूरकडे ओढा)
रोजगार बाजार : 60 ते 70 (विद्यार्थी मध्यम व कनिष्ठ स्तरावरील स्थानिक)
एआयमुळे आयटीमध्ये डेव्हलपरचे जॉब नामशेष होत आहेत. सध्या एआयची जोड असलेली कौशल्ये असलेल्या फ्रेशर्सना संधी मिळत आहे. मल्टीस्किल्स आता सर्व अभियांत्रिकी शाखांना लागू झाले आहे. इंटर्नशिप शिवाय आता कोणतीही कंपनी मुलांना कामावर रूजू करून घेत नाही. मोठ्या प्रमाणात मास कॅम्पस हायरिंग जवळपास थांबले आहे.
सुदर्शन सुतार, उपाध्यक्ष महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स