कोल्हापूर : माजी राज्यपाल व ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कसबा बावडा येथील यशवंत निवास या निवासस्थानी भेट घेऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. खा. सुळे यांनी स्व. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पत्नी शांतादेवी पाटील, डॉ. संजय पाटील, वैजयंती पाटील, पृथ्वीराज पाटील आणि वृषाली पाटील यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत या दुःखद प्रसंगात धीर दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, विरोधी पक्षनेते राजू लाटकर, शहराध्यक्ष आर. के. पवार, बाजीराव खाडे, पद्मजा तिवले, अश्विनी माने, मोहन सालपे, नगरसेवक सचिन चौगले, अजित पोवार-धामोडकर आदी उपस्थित होते.