WIFA Lifetime Achievement Award | खासदार शाहू महाराज यांना ‘विफा’चा जीवनगौरव पुरस्कार

फुटबॉल पंच राजेंद्र दळवी यांना विशेष ओळख पुरस्कार जाहीर
WIFA Lifetime Achievement Award | खासदार शाहू महाराज यांना ‘विफा’चा जीवनगौरव पुरस्कार
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : महाराष्ट्रातील फुटबॉल खेळाचा विकास व प्रचारासाठी आयुष्यभराचे योगदान देणारे कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशन (केएसए) चे चिफ पेट्रन खासदार शाहू महाराज यांना वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने प्रतिष्ठित ‘विफा’ जीवनगौरव पुरस्कार (छत्रपती शिवाजी महाराज सन्मान) जाहीर केला आहे. शनिवारी (दि. १७) सायंकाळी ६ वाजता, मुंबई येथील कुपरेझ फुटबॉल स्टेडियमवरील दिमाखदार सोहळ्यात पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी ‘केएसए’चे फुटबॉल सचिव व पंच राजेंद्र दळवी यांनाही विशेष ओळख पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

कोल्हापूरच्या फुटबॉलचा शतकोत्तर वारसा ‘केएसए’च्या माध्यमातून खासदार शाहू महाराज यांनी विकसित केला आहे. फुटबॉलबरोबरच इतर विविध खेळ प्रकारांसाठी संघटनात्मक बांधणी त्यांनी केली आहे. एकूणच कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राला त्यांचे भक्कम पाठबळ मिळत आहे. कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर सहा महिने सुरू राहणाऱ्या फुटबॉल हंगामातून हजारो कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आल्याचे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने पत्रकाद्वारे कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news