Road Accident | भादोलेजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Road Accident |
Road Accident | भादोलेजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
Published on
Updated on

पेठ वडगाव, पुढारी वृत्तसेवा : भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी शिगाव–भादोले दरम्यान घडली. संतोष शामराव कोळी (५०, रा. चिंदगे गल्ली, शिगाव, ता. वाळवा जि. सांगली) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नांव आहे. याची नोंद वडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

संतोष कोळी दुचाकी (एमएच १० ईटी २१५०) वरून वडगाव येथील पोलिस भरती अकॅडमी येथे मुलीला सोडून शिगावकडे परत जात होते. त्यावेळी समोरून भरधाव येणाऱ्या ट्रक (एमएच १० झेड ३७७६) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात कोळी गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडले. त्यांचे हेल्मेट दूरवर जाऊन पडले होते. पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या मागे वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी ट्रक चालक अनिल जयसिंग मोहिते (५६, रा. पाटील गल्ली, मोहरे, ता. पन्हाळा) याच्याविरुद्ध वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हेडकॉन्स्टेबल इंद्रजित शिंदे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news