Member of Parliament Fund | निधी खर्चाबाबत महाराष्ट्रातील बहुतांश खासदार नापास!

वर्षा गायकवाड ५७ टक्के खर्चासह अव्वल स्थानी; काही खासदारांचा खर्च शून्य ते एक-दोन टक्क्यांवर
Member of Parliament Fund |
Member of Parliament Fund | निधी खर्चाबाबत महाराष्ट्रातील बहुतांश खासदार नापास!
Published on
Updated on

सुनील कदम

कोल्हापूर : स्थानिक क्षेत्र विकास निधीच्या (खासदार फंड) खर्चाबाबत महाराष्ट्रातील बहुतांश मतदारसंघांतील खासदार कंजुषी करीत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. निधी खर्चाबाबत उत्तर मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड या अव्वलस्थानी आहेत, तर काही खासदारांचा खर्च केवळ एक-दोन टक्के इतकाच आहे.

दरवर्षी प्रत्येक खासदारांना आपापल्या मतदारसंघातील विविध विकासकामे करण्यासाठी वार्षिक ५ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मिळको. पण, राज्यातील बहुतांश खासदार या निधीचा परिपूर्ण वापर करीत नाहीत, असे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसून येते. केंद्रातील मोदी सरकारची ही तिसरी टर्म सुरू आहे. या कालावधीत राज्यातील प्रत्येक खासदारांना सरासरी १४ कोटी ७० लाख रुपयांचा खासदार निधी मंजूर करण्यात आलेला आहे. दोन-तीन खासदारांना त्यापेक्षाही जादा निधी मंजूर झालेला आहे. राज्याला खासदार फंडाच्या माध्यमातून ७१० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. पण, बहुतांश खासदारांच्या निधी खर्चाची टक्केवारी १०-१५ टक्क्यांच्या आतबाहेरच असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते.

सर्वात कमी खर्च करणारे!

गोवाल पाडवी : नंदूरबार

मंजूर १४.८० कोटी, वापर शून्य टक्के

श्रीकांत शिंदे : कल्याण

मंजूर १४.७० कोटी, वापर ०.२ टक्के

प्रतापराव जाधव : बुलडाणा

मंजूर १४.७० कोटी, वापर ०.८ टक्के

श्यामकुमार बर्वे : रामटेक

मंजूर १४.७० कोटी, वापर १ टक्के

संजय दिना पाटील : उत्तर-पूर्व मुंबई

मंजूर १४.७० कोटी, वापर १.१ टक्के

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news