Kolhapur Crime News | नगरसेविकेचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

Kolhapur Crime News |
Kolhapur Crime News | नगरसेविकेचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : शिवीगाळ करून धमकी देत नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी तानाजी आनंदराव जाधव (रा. आयटीआयजवळ, हनुमाननगर, कोल्हापूर) याच्या विरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला. संबंधित नगरसेविकेने जाधव याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

पीडिता कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत. सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामासाठी जात असताना आयटीआय ते पाचगाव रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी संशयिताने वडिलासह मला स्वत:ला शिवीगाळ करून धमकी देत असभ्य वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

संशयित तानाजी आनंदराव जाधव (रा. हनुमाननगर, कोल्हापूर) याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी रात्री उशिरा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितले. मनपा आरोग्य विभागाच्या निरीक्षकांनी फिर्याद दाखल केली असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, कोल्हापूर महापालिकेतील सत्ताधारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेविकांनी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांची भेट घेऊन विकासकामाला जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करणाऱ्या आनंदराव जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली होती. शिष्टमंडळात उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे, महिला बाल कल्याण समितीचे सभापती कौसर बागवान, गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादी गट नेते आदिल फरास आदींचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news