वारणानगर : विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाला दोन जागांवर यश मिळाल्याने माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाहूवाडी-पन्हाळ्याचे आमदार डॉ. विनय कोरे व हातकणंगलेचे आमदार डॉ. अशोकराव माने यांचे अभिनंदन करून सत्कार केला. यावेळी आ. कोरे व आ. माने यांनी भाजपला पाठिंबा दिला.
शाहूवाडीतून आ. विनय कोरे यांनी 36,056 व हातकणंगलेतून डॉ. अशोकराव माने यांनी 46,249 इतक्या मताधिक्याने विजय मिळवला. दोघांनाही फडणवीस यांनी मुंबईला आमंत्रित केले होते. सागर निवासस्थानी फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर जनसुराज्यच्या दोन्ही आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला. महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाने मोठी मदत केल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी युवा नेते ज्योतिरादित्य कोरे, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, केडीसीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.