

कोल्हापूर : विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस शनिवारी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विविध संस्था, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून विधायक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीची वीण घट्ट करण्यात आली. यावेळी 6 लाखांहून अधिक वह्या संकलित झाल्या.
आमदार सतेज पाटील यांनी सकाळी ग्रामदैवत हनुमान आणि दख्खनचा राजा जोतिबाचे दर्शन घेतले. आई सौ. शांतादेवी डी. पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, सौ. वैजयंती संजय पाटील तसेच सौ. राजश्री काकडे, माजी आमदार ऋतुराज पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री सतेज पाटील, तेजस सतेज पाटील यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.
आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘देऊया गरजूंना साथ, वाढदिनी मदतीचा हात’ या उपक्रमांतर्गत इचलरकंजीत अनाथ मुलांच्या वसतिगृहात अन्नदान, इंदिरा गांधी रुग्णालयात फळे वाटप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बालकल्याण संकुल येथे अन्नदान, कसबा बावडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करू नये, यासाठी इंडिया आघाडीच्या वतीने शिवाजी विद्यापीठात मानवी साखळी करण्यात आली. शिव-शाहू मुस्लिम संघटनेच्या वतीने आ. पाटील यांची गुळाची तुला करण्यात आली.
दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, दैनिक ‘पुढारी’चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, खा. उदयनराजे भोसले, खा. धैर्यशील माने, खा. मुकुल वासनिक, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, अरुण लाड, इम—ान प्रतापगडी, वर्षा गायकवाड, गुजरातचे विरोधी पक्ष नेते परेश धनानी, कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील, कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडुराव यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.
‘यशवंत निवास’समोर उभारलेल्या भव्य मंडपामध्ये दुपारी 4 वाजल्यापासून जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून राजकीय, सहकार, शैक्षणिक, कृषी, कला, क्रीडा, आरोग्य सामाजिकसह विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. त्यामध्ये खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री शंभूराज देसाई, आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, माजी आमदार मालोजीराजे, राजुबाबा आवळे, सत्यजित पाटील-सरूडकर, डॉ. सुजित मिणचेकर, के. पी. पाटील, जि. प.चे माजी अध्यक्ष राहुल पी. पाटील, राजेश पी. पाटील, जिल्हा बँक संचालक भैया माने, युवराज पाटील, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी, सुनील शिंत्रे, आर. के. पोवार, बाळ पाटणकर, क्रीडाईचे के. पी. खोत, संचालक, राहुल देसाई, राहुल खंजिरे, राजेश लाटकर, अॅड. महादेवराव आडगुळे, हरिदास सोनवणे, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, गिरीश फोंडे, मानसिंग बोंद्रे, सचिन चव्हाण, संजय मोहिते, राहुल माने, महेश सावंत तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता. मातोश्री वृद्धाश्रमातील सदस्यांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
गेल्या पंधरा वर्षांपासून आ. सतेज पाटील यांच्या वाढदिवसदिवशी पुष्पगुच्छ ऐवजी वह्या संकलनाचा उपक्रम राबविला जातो. यावर्षीही या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे 6 लाखांहून अधिक वह्यांचे संकलन झाले. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर त्याचे वितरण करण्यात येते.