कोल्हापूर : विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे नूतन आमदार कौस्तुभ गावडे यांनी शुक्रवारी दै. 'पुढारी' चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे आशीर्वाद घेतले. येणाऱ्या काळात विविध शैक्षणिक प्रश्नांवर मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा डॉ. जाधव यांच्याकडे त्यांनी व्यक्त केली.
शुक्रवारी सायंकाळी त्यांनी दैनिक 'पुढारी' कार्यालयास भेट दिली. संपादक डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी आमदार गावडे यांचे स्वागत केले. पुणे विभागातील शिक्षकांचे आणि शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित अनेक प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीची मोठी जबाबदारी आहे. ती यशस्वीपणे पेलण्यासाठी दै. 'पुढारी'ने पाठबळ द्यावे, मार्गदर्शन करावे, असे सांगत आमदार गावडे म्हणाले, येत्या सहा वर्षांत शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे उपस्थित होते.