

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे नूतन आमदार चंद्रदीप नरके यांनी गुरुवारी दैनिक ‘पुढारी’स सदिच्छा भेट दिली. त्यांनी दैनिक ‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आ. नरके यांनी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी आमदार नरके यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी गोकुळचे संचालक आणि कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य के. एस. चौगुले, मधुकर जांभळे, शिवाजी देसाई, सोनाजी पाटील, दिलीप पाटील, हंबीरराव पाटील, प्रा. शहाजी कांबळे, बाळासाहेब वाशीकर, संजय पाटील, एकनाथ पाटील, जनार्दन पाटील, स्वप्निल शिंदे, अरुण पाटील आदी उपस्थित होते. करवीर मतदारसंघात चंद्रदीप नरके विरूद्ध काँग्रेसचे राहुल पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली होती. यात नरके यांनी विजय मिळवला.