

यड्राव : येथील पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असलेले ओंकारेश्वर मंदिरा मध्ये महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.पहाटेपासून दुग्धाभिषेक, नाम जप, पालखी मिरवणूकीसह ,भजन , ओम नमः शिवायच्या जयघोषाने मंदिर परिसर शिवमय झाला होता.पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
भाविकांनी शिवलिंगास पहाटे साडेचार वाजता दुग्धाभिषेकास सुरुवात झाली. दिवसभरात अखंड दुग्धाभिषेक ,संततधार जलाभिषेक , भजन, ,सामुदायिक शिवलीलामृत व शिवसहस्रनांम जप , ओम नमः शिवाय नामजप , सायंकाळी मंदिरास पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर महाआरती व रात्रीबारा वाजता प्रदोष अभिषेकाने धार्मिक कार्यक्रमाची सांगता झाली. .भाविकांच्या ओम नमः शिवाय नाम जप उच्चार परीसरात घुमत होता. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्री गणेश महादेव व श्री पार्वती यांच्या मूर्तीच्या मागे काचेच्या केलेल्या भव्यकलाकृती आकर्षण ठरत होत्या.
मंदिर परिसर मध्ये विविध खाद्यपदार्थ, खेळणी व पूजन साहित्याचे स्टॉल मांडले होते .मंदिर समितीच्या वतीने सर्व भाविकांना उपवासाचे पदार्थ प्रसाद म्हणून देण्यात आले . भाविकांना उन्हापासून संरक्षण , व वाहने पार्किंगची सोय करण्यात आली होती. सायंकाळपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .
धार्मिक कार्यक्रमाचे पौराहित्य तेजस स्वामी ,आनंद शर्मा यांनी केले. भरत लड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भाविकांची पार्किंग व्यवस्था व दर्शन घेण्यासाठी योग्य नियोजन केले होते.
ओंकारेश्वर मंदिर श्री गणेश ,पार्वती ,शिवलिंग ,नंदी व कासव या पाच दैवतांच्या वेगवेगळी पांच शिखरे असलेले एकमेव मंदिर आहे. .मंदिरातील भव्य असलेले शिवलिंग भाविकांचे आकर्षण ठरते .पंचक्रोशीमध्ये हे मंदिर जागृत देवस्थान मानले जाते . महाशिवरात्र निमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, मंदिरात फुलांची आकर्षक रचना केली होती.