Ganja Smuggling: गांजा तस्करीप्रकरणी मिरजेतील सराईत जेरंबद; चिपरी फाट्यावर कारवाई

गांजा तस्करी करणाऱ्या मिरजेतील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने चिपरी फाट्याजवळ सापळा रचून जेरबंद केले
Ganja Smuggling
Ganja Smuggling(File Photo)
Published on
Updated on

कोल्हापूर/जयसिंगपूर : कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात गांजा तस्करी करणाऱ्या मिरजेतील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने चिपरी फाट्याजवळ सापळा रचून जेरबंद केले. वैभव राजाराम आवळे ( वय 26, रा. हडको कॉलनी, शंभर फुटी रस्ता, मिरज) असे त्याचे नाव आहे. संशयिताकडून 1 लाख 82 हजार रुपये किमतीचा 5 किलो गांजा हस्तगत करण्यात आला.

संशयित वैभव आवळे सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडा, आर्म ॲक्टसह विविध 8 गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले. संशयिताविरुध्द जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आवळे हा दुचाकीवरून गांजा तस्करीसाठी सांगली जिल्ह्यातून कोल्हापूरकडे येत असल्याची माहिती लागली. सहाय्यक निरीक्षक सागर वाघ, संतोष गळवे यांच्यासह पथकाने चिपरी फाट्याजवळ सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. झडतीत 1 लाख 82 हजार 500 रूपये किंमतीचा गांजा आढळून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news