

पेठ वडगाव : हातकणंगले तालुक्यातील भादोले येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी वडगाव पोलिसांनी ओंकार प्रकाश मदने (वय 24, रा. भादोले) यास अटक केली आहे.
मदने याचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. पीडित मुलीस त्याने दोनशे रुपयांचे आमिष दाखवले. लाटवडे रोडवरील उसाच्या शेतात नेऊन ऑगस्ट व सप्टेंबर 2025 या कालावधीत तिच्यावर अत्याचार केला. याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. पीडित मुलगी गरीब असल्याने या घटनेची तक्रार केली नव्हती. तिला शारीरिक त्रास वाढू लागल्यानंतर याचा उलगडा झाला. पीडितेला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ओंकार मदने याला अटक करण्यात आली आहे. वडगाव येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.