

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जखमी आशिष सात वर्षांची शिक्षा भोगून डिसेंबर २०२५ मध्ये कारागृहातून बाहेर आला आहे. त्याचा मित्र अतुल पांढरे याचे बीएस्सी पर्यंत शिक्षण झाले असून, तो पुणे येथे नोकरीनिमित्त स्थायिक आहे. चार दिवसांपूर्वी तो कोल्हापुरात आला आहे. गुरुवारी सायंकाळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला. या रागातून अतुलने आशिषच्या डोक्यात मोठा दगड घातला. त्यामुळे आशिष निपचिप पडला. पुन्हा डोक्यात दगड घालून ठेचले.
ही घटना काही अंतरावर असलेल्या क्लासमधील विद्यार्थ्यांनी पाहिली. त्यांनी याची माहिती अग्निशमन दलास दिली. अग्निशमन दलाने तत्काळ जुना राजवाडा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. यावेळी पोलिस अंमलदार मोहन लगारे, नामदेव पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमीला रिक्षातून सीपीआर रुग्णालयात दाखल केले; मात्र त्याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले.
रक्ताचा सडा, मोबाईल अन् दुचाकीची चावी
हल्ल्यानंतर अतुल स्वत:हून जुना राजवाडा पोलिस ठाण्यात हजर झाला. आशिष रक्ताच्या थारोळ्यात १० मिनिटे निपचित पडला होता. त्याच्या चपला, मोबाईल, दुचाकीची चावी, रक्ताने माखलेला दगड याच ठिकाणी पडले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून या वस्तू जप्त केल्या.