kolhapur | कागल-सातारा महामार्ग कामाची प्रगती दाखवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा

जिल्हाधिकारी कार्यालय बैठकीत मंत्री मुश्रीफ यांचा कंत्राटदारांना इशारा
Minister Hasan Mushrif
मंत्री हसन मुश्रीफ. (File photo)
Published on
Updated on

कोल्हापूर : सातारा ते कागल महामार्गावरील सहापदरीकरणाच्या कामाची प्रगती दाखवा. अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कंत्राटदारांना दिला. विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक झाली.

मुश्रीफ म्हणाले, सातारा ते कागल महामार्गावरील सहापदरीकरणाच्या कामाची प्रगती 15 सप्टेंबरपर्यंत दिसून न आल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. या राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या महामार्गाचे काम जलदगतीने करून कामाची प्रगती दाखवा. प्रवाशांच्या सोयीचा विचार करून हे काम अत्यंत जलद पूर्ण करा.

कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीतील

ओसवाल एफएम हॅमरले टेक्स्टाईल कंपनी मागील वर्षापासून बंद असून कामगारांचे पगार व इतर भत्ते देण्याबाबत कामगार विभागाने गतीने कार्यवाही करावी. 29 प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींच्या जमिनींची मोजणी करून प्रकल्पग्रस्तांना सुविधा वेळेत उपलब्ध करून द्या. मुरगूड येथील सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावर पूल बांधण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण, कागल - राधानगरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले तसेच कामगार विभाग व अन्य संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news