Hasan Mushrif | गोकुळ निवडणुकीत काँग्रेसकडून जातीयवादी प्रचार : मंत्री मुश्रीफ

Hasan Mushrif
Hasan Mushrif | गोकुळ निवडणुकीत काँग्रेसकडून जातीयवादी प्रचार : मंत्री मुश्रीफ
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : गोकुळचे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांना दोन वेळेला अध्यक्षपदाने हुलकावणी दिली. त्यांना अध्यक्ष करण्याची जबाबदारी भविष्यात आम्हालाच पार पाडावी लागेल, असे सूचक वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी नंदुरबार येथे केले. तसेच गोकुळच्या निवडणुकीत काँग्रेसने जातीयवादी प्रचार केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

ते म्हणाले, गोकुळमध्ये अध्यक्ष निवडीसाठी १४ संचालक आवश्यक आहे. मात्र समविचारी आघाडीकडे १३ तर महायुतीकडे संख्या १२ आहे. यामध्ये अनेक तांत्रिक बाजू आहेत. दरम्यान, समविचारी आघाडीचे नेते आ. सतेज पाटील दूध उत्पादकांनी आम्हाला बहुमत दिले म्हणतात तर मग अध्यक्ष निवड पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी पूर्ण करावी.

मतदारांचा कौल महायुतीलाच

मंत्री मुश्रीफ म्हणाले, गोकुळमध्ये खऱ्या अर्थाने महायुतीलाच बहुमत मिळाले आहे. निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची संख्या ६५ हजारपर्यंत जाते. तर आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीला मिळालेल्या मतांची बेरीज ४८ हजार इतकी आहे. यावरून मतदारांचा कल कोणाला हे स्पष्ट होते.

मुलाला राखीव गटातून उभा करून चूक केली

गोकुळचे माजी अध्यक्ष व माझे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांना सर्वसाधारण गटातून उमेदवारी द्यायला हवी होती. त्यांना ओबीसी गटातून उमेदवारी दिली ही एक अर्थाने माझ्याकडून चूक झाली. त्यांना टार्गेट करण्यात आले. माझा मुलगा पराभूत झाला याचे मला दुःख आहे. धर्मनिरपेक्षतेचा आव आणणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी गोकुळच्या राजकारणात जातीयवादी प्रचार केला, असा गंभीर आरोपी मंत्री मुश्रीफ यांनी केला.

तिन्ही पक्षांनी सावध राहायला पाहिजे

गोकुळ निवडणुकीत भाजप आणि आमच्यामध्ये सुरू असलेला वाद अंतिम टप्प्यापर्यंत मिटला नाही. वादाचा फटका कसा बसतो हे निवडणुकीत सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे आता तिन्ही पक्षांनी सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे वक्तव्य मंत्री मुश्रीफ यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.