minister hasan mushrif : सोमय्या यांच्या दौर्‍यात जे गोंधळ घालतील ते कार्यकर्ते आपले असणार नाहीत

minister hasan mushrif : सोमय्या यांच्या दौर्‍यात जे गोंधळ घालतील ते कार्यकर्ते आपले असणार नाहीत
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे नेते किरीट सोमय्या मंगळवारी कोल्हापूर दौर्‍यावर येत आहेत. यादिवशी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा भंग होईल, असे कोणतेही कृत्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करू नये. त्यांना कोणीही अडवू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (minister hasan mushrif) यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले. सोमय्या यांच्या दौर्‍यात जे गोंधळ घालतील ते कार्यकर्ते आपले असणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, सोमय्या यांनी आरोप करताना आपल्याला तुरुंगात टाकणार, सोडणार नाही, अशी भाषा वापरली होती. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त होणे स्वाभाविक आहे. यातूनच त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात रोष निर्माण झाला होता. कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात निदर्शने केली.

सोमय्या यांनी आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक होते. परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून दहा वर्षांपूर्वीच्या प्रकरणावर आरोप करणे योग्य नाही. राजकीय जीवनात चारित्र्य महत्त्वाचे असते. नाव मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांना पंचवीस-तीस वर्षे लागतात. असे असताना सोमय्या यांच्यासारखे कोणी उठून आरोप करून शिंतोडे उडवत असतील तर ते अयोग्य आहे, असे मुश्रीफ (minister hasan mushrif) म्हणाले.

गडहिंग्लज साखर कारखान्यासंदर्भात केलेल्या आरोपाची चौकशी केल्यानंतर चौकशी यंत्रणाच कंपनीचा सत्कार केल्याशिवाय राहणार नाही. कारण कंपनीने आठ वर्षे हा कारखाना तोट्यात चालविला आहे. यामध्ये आपला काही संबंध नाही, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
कोल्हापूर दौर्‍यावर येणार्‍या सोमय्या यांना अडवू नका. त्यांना कुठे फिरायचे तिकडे फिरूद्या. सोमय्या यांनी जिल्ह्यात फिरत असताना जरा भाजपच्या स्थितीची देखील माहिती घ्यावी, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

यावेळी आ. राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आ. के. पी. पाटील, संध्यादेवी कुपेकर, शहर अध्यक्ष आर. के. पोवार, व्ही. बी. पाटील, युवराज पाटील, राजेश लाटकर आदी उपस्थित होते.

मुंबई बँकेची चौकशी

मुंबई सहकारी बँकेच्या कारभाराबाबत तक्रारी आल्यानंतर सहकार कायद्यानुसार या बँकेची चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

सोमय्यांनी शब्द जपून वापरावेत : पोवार

जिल्ह्याचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शब्दापुढे एकही कार्यकर्ता जाणार नाही. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत सर्व कार्यकर्ते सयंम राखतील. परंतु सोमय्या यांनी आरोप करताना अवमान होणार नाही याचे भान ठेवावे, शब्द जपून वापरावेत, असा इशारा शहर अध्यक्ष आर. के. पोवार यांनी दिला.

मंत्री मुश्रीफ यांचे जंगी स्वागत

मंत्री मुश्रीफ यांच्यावर आरोप झाल्यानंतर प्रथमच ते कोल्हापुरात आले होते. त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. शासकीय विश्रामधाम येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news