Hasan Mushrif | मंत्री हसन मुश्रीफ यांनी फुंकले ‘गोकुळ’ निवडणुकीचे रणशिंग

Minister Hasan Mushrif
मंत्री हसन मुश्रीफ(File photo)
Published on
Updated on

कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला ‘नंबर वन’ बनवा, त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन करत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे रणशिंग फुकले. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पक्षाच्या नवनिवार्चित सदस्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे यश मिळवले. जिल्हा परिषदेत तर सर्वाधिक जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. पक्षाच्या यशानंतर आता लवकरच होणार्‍या गोकुळ दूध संघ व जिल्हा बँक निवडणुकीसाठीही राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे.

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी लवकरच मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर होणार आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा निवडणुकीचे रण पेटणार आहे. गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारणाला आतापासूनच उकळी फुटायला सुरवात झाली आहे. गोकुळमध्ये सध्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसही असून त्यांच्याच पक्षाचा अध्यक्षही आहे. मात्र राज्यातील आणि नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुकीत बदलेल्या समीकरणामुळे गोकुळच्या निवडणुकीतही राजकीय समीकरणे बदलणार का याकडे लक्ष आहे, त्यातच मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळसाठी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आवाहन केले.

मुश्रीफ म्हणाले, जिल्हा परिषदेनंतर गोकुळ व जिल्हा बँकेतही राष्ट्रवादी काँग्रेसचे नंबर वनचे लक्ष्य आहे. याकरिता कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. गोकुळ दूध संघात जास्तीत जास्त ठराव आपल्या बाजूने यावेत, यासाठी आतापासूनच नियोजन सुरू करा. त्याकरिता आतापासूनच कामाला लागा, असे सांगत जिल्हा परिषदेत जसे यश मिळवले, तसेच गोकुळमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसला नंबर वन बनवूया, असा निर्धारही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news