Kolhapur | गोकुळ निवडणुकीची रणनीती चुकली : मंत्री चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील. File Photo
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, एवढ्या मोठ्या संस्थेच्या निवडणुकीत निकालाचा अंदाज चुकू शकतो. ‘नो प्रॉब्लेम, फिरसे तयारी करेंगे,’ असे म्हणत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पराभवावर पडदा टाकत पुन्हा तयारीला लागण्याचा निर्धार व्यक्त केला.

मंत्री पाटील म्हणाले, साडेपाच लाख दूध उत्पादक, साडेचार हजार कोटींची उलाढाल आणि ५,४०० हून अधिक मतदार असलेल्या संस्थेच्या निवडणुकीत अंदाज चुकणे स्वाभाविक आहे. पराभवाचे विश्लेषण करताना ३२ वेगवेगळे मुद्दे समोर येऊ शकतात. पालकमंत्र्यांनी उपस्थित केलेला ‘ओव्हर कॉन्फिडन्स’ हा त्यातील एक मुद्दा असू शकतो. मतदार आपल्यासोबतच राहतील, या विश्वासातून काही ठिकाणी अंदाज चुकला असावा. गोकुळ निकालानंतर महायुतीतील मतभेद दूर करून आगामी जिल्हा बँकेसह अन्य निवडणुका एकजुटीने लढविण्याचा प्रयत्‍न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news