Gokul dairy | सहायक निबंधक कदम मुंबईत; सुनावणी थांबली

वरिष्ठ अधिकार्‍यांकडून अचानक बोलाविले
Gokul dairy |
Gokul dairy | सहायक निबंधक कदम मुंबईत; सुनावणी थांबली
Published on
Updated on

कोल्हापूर : सहायक निबंधक दुग्ध सुजय कदम बुधवारी मुंबईला रवाना झाल्याने दूध संस्थांबाबत सुनावणी होऊ शकली नाही. सहकार विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कदम यांना अचानक बोलवणे आल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे. कदम दिवसभर मुंबईमधील कार्यालयात थांबून होते.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाशी संलग्न 1200 दूध संस्थांची अवसायन कारवाईप्रकरणी सुनावणी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आजरा, करवीर, कागल, हातकणंगले या तालुक्यांतील बहुतांश दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाली आहे. बुधवारपासून उर्वरित दूध संस्थांच्या सुनावणीस सुरुवात होणार होती; मात्र सहायक निबंधक कदम यांना वरिष्ठ अधिकार्‍यांनी मुंबईला बोलावून घेतले. दिवसभर ते कार्यालयात थांबून होते. गोकुळसंदर्भात सुरू असलेल्या या घडामोडींची महिती वरिष्ठांनी कदम यांच्याकडून घेतल्याचे समजते.

उर्वरित दूध संस्थांची सुनावणी आजपासून

अवसायन प्रक्रियेतील दूध संस्थांपैकी 399 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाली आहे. उर्वरित दूध संस्थांच्या सुनावणीला आजपासून सुरुवात होणार आहे. सर्व दूध संस्थांना सुनावणीची तारीख कळविली आहे. त्यानुसार उर्वरित दूध संस्थांची सुनावणी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news