

कोल्हापूर : दूध व्यवसायाचे अर्थकारण सध्या उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारपेठेतील स्पर्धा अशा दुहेरी आव्हानांना सामोरे जात आहे. चारा टंचाई, पशुखाद्याच्या वाढत्या किमती, पशुपालनाचा खर्च यामुळे दूध उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. यामुळे गोकुळ, वारणा यांसह अन्य दूध संघांनी खरेदी दरात वाढ केली. या निर्णयामुळे उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे १६ कोटी रुपये अतिरिक्त मिळणार आहेत. खरेदी दरातील दरवाढीमुळे उत्पादकांना दिलासा मिळाला असला तरी विक्री दरात प्रतिलिटर सहा रुपये दरवाढ झाल्याने ग्राहकांना मात्र महागाईचा चटका बसला आहे. तसेच दुधाशी संबंधित व्यवसायांनाही फटका बसणार असून उत्पादन खर्च वाढल्याने त्यांच्यासाठीही दरवाढ करणे अनिर्वाय राहणार आहे.
म्हैस दूध विक्री दरात प्रतिलिटर सहा रुपये, तर गाय दूध विक्री दरात चार रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे उत्पादकांना दिलेल्या दरवाढीपेक्षा विक्री दरातील वाढ अधिक असल्याचे चित्र दिसते. अर्थात, खरेदी आणि विक्री दरातील फरक म्हणजे दूध संघाचा थेट नफा असे समीकरण नसते. दूध संकलन, प्रक्रिया, वाहतूक, पॅकिंग, वितरण आणि अन्य व्यवस्थापन खर्चाचाही विचार करावा लागतो. दुसरीकडे, दूध उत्पादकांसाठी ही दरवाढ महत्त्वाची असली तरी वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत ती पुरेशी ठरणार का, हा प्रश्न आहे. पशुखाद्याचे वाढते दर आणि चारा उपलब्धतेतील अनिश्चितता यामुळे दूध व्यवसायातील नफ्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे केवळ खरेदी दरवाढ न करता उत्पादन खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठीही उपाययोजना आवश्यक आहेत.
दुधाच्या वापरावर मर्यादा दुधाच्या दरात आत्तापर्यंत दोन रुपये वाढ होत होती. मात्र पहिल्यांदाच सहा रुपयांची मोठी वाढ झाली आहे. यामुळे अर्धा लिटर दुधासाठीच आता महिन्याला बाराशे रुपये मोजावे लागणार आहेत. कष्टकरी, सर्वसामान्य कुटुंबांसाठी सध्याचा दुधाचा दर विचार करायला लावणारा आहे. त्यामुळे आता घरामधील दुधाच्या दैनंदिन वापरावर मर्यादा घालाव्या लागणार आहेत.
सुनीता दाभोळे, गृहिणी उत्पादकांना तूर्तास दिलासा