Youth Drowning death | जलतरण तलावात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू

सहकारी मित्र बचावला; आई, वडिलांचा आक्रोश
Youth Drowning death |
Youth Drowning death | जलतरण तलावात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू
Published on
Updated on

कोल्हापूर : क्लासमधील मित्रासमवेत पोहण्यासाठी गेलेल्या अभिनंदनकुमार राजेशकुमार सिंह (वय 18, रा. न्यू शाहूपुरी, कोल्हापूर, मूळ दरभंगा, बिहार) या परप्रांतीय तरुणाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. शिवाजी स्टेडियम जलतरण तलावात रविवारी सायंकाळी ही घटना घडली. अभिनंदनसमवेत पाण्यात उतरलेल्या मित्राला नागरिकांनी तत्काळ बाहेर काढल्याने अनर्थ टळला.

अभिनंदनचा बुडून मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांसह मित्रांनी जलतरण तलाव, शासकीय रुग्णालय आवारात गर्दी केली. जुना राजवाडा, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेत त्याला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news