

म्हाकवे; पुढारी वॄतसेवा : म्हाकवे येथील सोहन कुंभार या पैलवानाची आशियाई कुस्तीसाठी निवड झाली आहे. जॉर्डन येथे होणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघाचे तो नेतृत्व करणार आहे. या निवडीनंतर म्हाकवेच्या ग्रामस्थांकडून त्याचे कौतुक होत आहे.
म्हाकवे येथील मल्ल सोहम सुनील कुंभार याने हरियाणा सोनपत येथील कुस्ती मैदानात 48 किलो गटात सुवर्ण पदक मिळवले. या विजयानंतर त्याची निवड जॉर्डन येथे होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे. त्याला वस्ताद तुकाराम चोपडे, रवींद्र पाटील, सुनील कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. सोहम हा शाहू कारखान्याचा मानधनधारक पैलवान आहे. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे गरीब कुटुंबातील सोहम कुंभार याने लहानपणापासूनच कुस्तीमध्ये अनेक पदके मिळवले आहेत त्याचे वडील वीट व्यवसाय करतात शालेय कुस्ती स्पर्धेपासून त्याने अनेक सुवर्णपदके मिळवली आहेत तो सध्या नववीच्या वर्गामध्ये शिकत आहे.