Marathi Film Corporation | चित्रपट महामंडळ अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले

उपाध्यक्षपदी यमकर, आनंद शिंदे, तर मुख्य कार्यवाहपदी सुशांत शेलार
Marathi Film Corporation |
Marathi Film Corporation | चित्रपट महामंडळ अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले
Published on
Updated on

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी धनाजी यमकर, आनंद शिंदे, तर मुख्य कार्यवाहपदी सुशांत शेलार यांची निवड झाली. खजिनदारपदी सुनील महाजन, सहखजिनदारपदी शरद चव्हाण, तर सहकार्यवाहपदी दीपक कदम व प्रवीण पाटील यांची निवड झाली.

२०२६ ते २०३१ या कार्यकाळासाठी नूतन पदाधिकारी निवडीसाठी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी (दि. १५) कोल्हापुरात झाली. बैठकीच्या अध्यक्ष तथा निवडणूक निर्णय अधिकारी रागिणी खडके यांनी कार्यकारिणीची निवड जाहीर केली.

निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष राजेभोसले म्हणाले, चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची पहिली बैठक २३ जून रोजी पुणे येथे होणार आहे. या बैठकीत सभासदांना कार्ड देणे, वृद्ध कलावंतांचे मानधन, कर्मचाऱ्यांचे पेन्शन यांसंदर्भातील निर्णय घेतले जातील. पहिले मराठी चित्रपट संमेलन भरविण्यात येणार असून त्याबाबतही शिक्कामोर्तब होईल. सोलापूर, नवी मुंबई, रत्नागिरी आणि अहिल्यानगर येथे शाखा कार्यालये स्थापन केली जातील. कोल्हापुरातील कार्यालयाचे रखडलेले काम सुरू केले जाणार आहे. अभिनेते विक्रम गोखले यांनी दिलेल्या दोन एक जागेवर कलावंतांसाठी वृद्धाश्रम उभारणीबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. निर्मात्यांना अनुदानासाठी महामंडळाची रद्द केलेली ‘ना हरकत’ प्रमाणपत्र अट पूर्ववत करण्यासाठी लवकरच सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे राजेभोसले यांनी सांगितले.

यावेळी संचालक अजित शिरोळे, राज काझी, सुभाष नकाशे, चैत्राली डोंगरे, रवींद्र गावडे, गणेश गारगोटे, विकास तोरणे आदी उपस्थित होते. दरम्यान,या बैठकीला विरोधी गटाच्या संचालिका अभिनेत्री वर्षा उसगावकर अनुपस्थित होत्या.

राज्यात ३०० चित्रपटगृहे उभारणार

राजेभोसले म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीला नवी उभारी देण्यासाठी राज्यभरात १५० आसनक्षमतेची ३०० चित्रपटगृहे उभारण्याचा संकल्प अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने केला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना अधिक स्क्रीन उपलब्ध होऊन उद्योगाला मोठी चालना मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news