

कोल्हापूर : नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग प्रकल्पाविषयी मुंबईत मंगळवारी (दि. 8) दुपारी 2 वाजता बैठक आयोजित केली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात बैठक होणार आहे. रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील भूसंपादनाबाबत चर्चा केली जाणार आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्राच्या विकासासाठी शक्तिपीठ महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकर्यांनाही हळूहळू महामार्गाची वस्तुस्थिती समजू लागली आहे. शेतकर्यांना महामार्ग पाहिजे आहे. कारण, राज्यात ज्या-ज्या ठिकाणी महामार्ग झाले. तेथे दळणवळण वाढल्याने त्या परिसरातील जमिनांना दर मिळाला. तेथील भागाचा विकास झाला. त्यामुळे 62 गावांमधून जाणार्या या महामार्गाला शेतकर्यांचे समर्थन आहे. विरोधकांचे राजकारण आता शेतकर्यांच्या लक्षात आले आहे. परिणामी, महामार्गाच्या विरोधाची धार कमी होत आहे. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणारे 2014 पर्यंत सत्तेत होते. त्यांनी कसलाच विकास केला नाही. आता फक्त विरोधाचे राजकारण करत आहेत, असेही आ. क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.