कोल्हापुरातील एमडी ड्रग्ज विक्रीचे मुंबई, गोवा कनेक्शन, आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Kolhapur Crime | एका महिलेसह चौघांना अटक
Kolhapur Crime
कोल्हापुरातील एमडी ड्रग्ज विक्रीचे मुंबई, गोवा कनेक्शन समोर आले आहे. (File Photo)
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा; अमली पदार्थ विक्री करणार्‍या आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका महिलेसह चौघांना अटक करून त्यांच्याकडून 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रोहित बसुराज व्हसमनी (वय 24), अनिल संतराम नंदीवाले (31, रा. दोघेही रा. माळवाडी, दोनवडे, ता. करवीर), मनीषा महेंद्र गवई (25, रा. नवी मुंबई), एड्मंड दिलीप स्पेन्सर परेरा (54, रा. नवी मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

व्हसमनी हा 7 फेब्रुवारी 2025 रोजी एम. डी. पावडर, गांजा विक्रीसाठी फुलेवाडी सहाव्या बसस्टॉपजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून 2 ग्रॅम एमडी पावडर आणि सव्वा किलो गांजा सदृश्य अमली पदार्थ, दुचाकी वाहन जप्त करण्यात आले. व्हसमनी याला नंदीवाले हा अमली पदार्थ देत होता, तर नंदीवाले हा गवई व स्पेन्सर परेरा यांच्याकडून अमली पदार्थ घेऊन विक्री करत होता, असे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता.

गोव्यातून फिरून मुंबईत अटक...

गुन्हा दाखल झाल्यापासून नंदीवाले हा पसार झाला होता. त्याचा शोध घेत असताना पोलिसांना तो गोवा येथे गेल्याचे समजले. मात्र, नंतर पुन्हा तो मुंबईत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस गोव्यातून मुंबईला गेले. 13 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी आरोपी राहत असलेल्या ठिकाणी सापळा लावला. 14 फेब्रुवारी रोजी सेक्टर नं. 22, मारवा गृहसंकुल येथे नंदीवाले, गवई, स्पेन्सर परेरा यांना पोलिसांनी अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news