kolhapur Crime News | दम मारो दम टोळीच्‍या पाचजणांवर ‘मोका’

kolhapur Crime News |
kolhapur Crime News | दम मारो दम टोळीच्‍या पाचजणांवर ‘मोका’
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : जबरी चोरी, घरफोडीसह खुनाचा प्रयत्न, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दम मारो दम टोळीच्या म्होरक्यासह पाचजणांवर बुधवारी पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ‘मोका’अंतर्गत कारवाई केली. चार महिन्यांत राजारामपुरी पोलिसांनी ३ टोळ्यांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई करून दणका दिला आहे. टोळीचा म्होरक्या सुनील वसंत वाळकुंजे (वय २२, रा. उचगाव), रोहित रघुनाथ जाधव (२४, मणेरमळा, उचगाव), प्रफुल्ल सर्जेराव गजबर (१९, रा. सरनोबतवाडी), साद फारूख बेपारी (१९, मुडशिंगी) व रोहन रुपेश पाटील (२२, उचगाव) अशी कारवाई केलेेल्यांची नावे असून, हे पाचही जण सध्या कळंबा कारागृहात आहेत.

चार महिन्यांत तीन टोळ्यांवर ‘मोका’

राजारामपुरी पोलिसांनी गेल्या चार महिन्यांत तीन टोळ्यांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई केली. यामध्ये गेंड्या टोळी, गवळी गँग, दम मारो दम टोळीचा समावेश आहे.

‘दम मारो दम’ टोळीवर दहा गंभीर गुन्‍हे दाखल

शहरासह करवीर तालुक्यात सुनील वाळकुंजे याच्या 'दम मारो दम' टोळीने दहशत पसरवली होती. या टोळीवर जबरी चोरी, घरफोडी, खंडणीसह खुनाच्या प्रयत्नासारखे दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. २९ सप्टेंबरला राजाराम तलाव परिसरात लघुशंकेला थांबलेल्या तरुणाला मारहाण करून लुटले होते. याप्रकरणी या टोळीच्या पाच संशयितांना राजारामपुरी पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता. पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी या टोळीविरोधात 'मोका'चा प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्याकडे पाठविला होता. यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे पाठवला होता. बुधवारी या प्रस्तावास मंजुरी मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.