Illegal Abortions Case | अवैध गर्भलिंग निदान; स्वप्नील पाटील गँगच्या ११ जणांवर ‘मोका’

Illegal Abortions Case |
Illegal Abortions Case | अवैध गर्भलिंग निदान; स्वप्नील पाटील गँगच्या ११ जणांवर ‘मोका’
Published on
Updated on

कोल्हापूर : गर्भलिंग निदान करून स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्या स्वप्नील पाटील गँगमधील बोगस डॉक्टर, एजंट, डॉक्टर अशा ११ जणांच्या ‘मोका’ कारवाईस मंगळवारी मंजुरी देण्यात आली. करवीर पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावास विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी मंजुरी दिली.

स्वप्नील केरबा पाटील (३५, रा. बालिंगा, ता. करवीर), महेश सुबराव पाटील (३५), दत्तात्रय कृष्णात पाटील (४०, दोघेही रा. सिरसे, राधानगरी), श्रीमंत तानाजी पाटील (३७, रा. परिते. ता. करवीर), विजय लक्ष्मण कोळसकर (३९, रा. मडिलगे खुर्द, ता. भुदरगड), ओंकार गोरखनाथ कराळे (३०, रा. सडोली खालसा, ता. करवीर), प्रशांत वसंत जाधव (४२, रा. वैभवनगर, बेळगाव), सुनील प्रकाश पाटील (३८, रा. सिरसे, ता. राधानगरी), अनिल प्रकाश टिपुगडे (४०, रा. भोगावती साखर कारखाना क्वॉटर्स, मूळ रा. दडपेवाडी शिरगाव, ता. करवीर), शिवप्रसाद सत्ताप्पा महादेव पाटील (४०, रा. शिवगंगा अपार्टमेंट, इचलकरंजी), अश्विनी गजानन शिंदे (३८, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

राज्यातील पहिलीच कारवाई

गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणात करवीर पोलिसांनी केलेली ही राज्यातील पहिलीच कारवाई ठरली आहे. या प्रस्तावामुळे बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान व गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news