kolhapur | स्वच्छता मोहिमेसाठी महापौर रूपाराणी निकम उतरल्या रस्त्यावर

दिवसभरात आठ टन कचरा उठाव
kolhapur |
कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत स्वत: महापौर रूपाराणी निकम यांनी रस्त्यावर उतरून सफाई केली. (छाया : मिलन मकानदार)
Published on
Updated on

कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने रविवारी (दि. 29) शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम अभियान राबविण्यात आले. स्वत: महापौर रूपाराणी निकम स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. या स्वच्छता मोहिमेत 8 टन कचरा, प्लास्टिक, तणकट, खरमाती व इतर कचरा गोळा करण्यात आला.

महापौर रूपाराणी निकम यांनी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्याची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार ही स्वच्छता मोहीम घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे यांच्या नियंत्रणाखाली सकाळी 7 वाजलेपासून ही स्वच्छता मोहीम झाली.

यावेळी मुख्य रस्ते, फुटपाथ वरील तण, खरमाती, प्लास्टिक व कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला. या मोहिमेतून 20 ट्रॅक्टर, 4 डंपर कचरा संकलित केला. मनपातील विविध विभागांतील कर्मचारी, अधिकार्‍यांसह नागरिकांनी मोहिमेत सहभाग नोंदविला. सभागृहनेता मुरलीधर जाधव, उपशहर अभियंता अरुण गुजर, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, सर्व आरोग्य निरिक्षक महापालिका आरोग्य विभागाचे 500 व विविध विभागांकडील 250 कर्मचारी उपस्थित होते.

शहरात या परिसरात झाली स्वच्छता

शहरातील सायबर चौक, आयएस ट्रेनिंग सेंटर, टाकाळा चौक ते शेंडा पार्क रोड, हॉकी स्टेडिअम चौक, व्हिनस कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय रोड, माऊली पुतळा, रेड्याची टक्कर चौक, खानविलक पेट्रोप पंप ते धैर्यप्रसाद चौक, व्हिनस कॉर्नर ते सीबीएस स्टँड व पंचगंगा नदी घाट.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news