kolhapur | घरात सुरू होती बारशाची घाई; पोटच्या गोळ्याला सोडून गेली आई

kolhapur |
kolhapur | घरात सुरू होती बारशाची घाई; पोटच्या गोळ्याला सोडून गेली आई
Published on
Updated on

कोल्हापूर : अवघ्या एक महिन्याच्या मुलीच्या बारशाच्या तयारीसाठी कुटुंबीयांची धांदल उडालेली असतानाच वर्षापूर्वी विवाह झालेल्या विवाहितेने राहत्या घरी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन जीवन संपवले. अस्मिता प्रतीकसिंह काटकर ( वय २१, रा. काटकर पार्क, सायबर चौक, राजारामपुरी, कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.

रविवारी सायंकाळी घडलेल्या घटनेने कुटुंबीयासह नातेवाईकांना धक्का बसला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. राजारामपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा घटनेची नोंद झाली आहे. पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. लाटगाव (ता. आजरा) येथील अस्मिता हिचा वर्षापूर्वी सायबर चौक येथील प्रतीकसिंह काटकर यांच्याशी विवाह झाला. महिन्यापूर्वी अस्मिता प्रसूत झाली. दोन दिवसांत मुलीला एक महिना होत असल्याने घरात बाळाच्या बारशाची तयारी सुरू होती.

रविवारी दुपारी सासू, सासरे व पती बारशाच्या कार्यक्रमासाठी हॉल ठरविण्यासाठी गेले होते. यावेळी घराचा मुख्य दरवाजा बंद करून अस्मिताने बेडरूममधील छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतला. काहीवेळाने पतीसह सासू-सासरे घराकडे परतले. दरवाजा आतून बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी हाका मारल्या, मोबाईलवर कॉल केला.

घरातून प्रतिसाद मिळेना. अखेर त्यांनी दरवाजा तोडून प्रवेश केला असता, अस्मिताने गळफास घेऊन जीवन संपवल्याचे निदर्शनास आले. गळफास सोडवून तिला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शेंडा पार्कात हलविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत कारण अस्पष्ट होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news