Shaktipeth Highway | ‘शक्तिपीठ’विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Shaktipeeth Highway |
Shaktipeth Highway | ‘शक्तिपीठ’विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीतर्फे मंगळवारी (दि. ९) जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे.

दसरा चौकातून सकाळी ११ वाजता मोर्चा सुरू होईल. दसरा चौका व्‍हिनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जाणार आहे. या मोर्चात खासदार शाहू महाराज, विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती शक्तिपीठ महामार्ग विरोधी समितीचे समन्वयक गिरीष फोंडे व प्रकाश पाटील यांनी दिली.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलिस बंदोबस्त

शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहर, जिल्ह्यासह महामार्गावर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी शहरासह जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना संतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. सकाळी ११ वाजता दसरा चौकातून मोर्चाला प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस उपअधीक्षक-१, पोलिस निरीक्षक- ८, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक- १५, पोलिस अंमलदार १५०, याशिवाय राज्य राखीव दल, जलद कृती दलाची पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news