Jewellery Theft | ओळखीचा फायदा घेत शेजाऱ्याच्या दागिन्यांवर मारला डल्ला

Jewellery Theft |
Jewellery Theft | ओळखीचा फायदा घेत शेजाऱ्याच्या दागिन्यांवर मारला डल्लाFile Photo
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : ओळखीचा गैरफायदा घेत शेजारच्या घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शुक्रवारी सापळा रचून जेरबंद केले. अभिजित पंढरी वाडकर (वय १९, रा. पाटील कॉलनी, मणेर मळा, उचगाव, ता.करवीर) असे त्याचे नाव आहे. संशयिताकडून तीन लाख २५ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले.

मणेर मळा येथील वर्षा राजेश चौगुले (रा. महालक्ष्मीनगर, उचगाव) यांच्या घरी दि. २० ऑक्टोबरला चोरी झाली होती. चोरट्याने सोन्याची साखळी, अंगठीवर डल्ला मारला होता. याप्रकरणी गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयिताचा छडा लावला. संशयित वाडकर हा मणेर मळा, शिवराम पार्क परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, विशाल खराडे यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. झडतीत त्याच्याकडे दागिने आढळून आले. अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने शेजारच्या घरात चोरी केल्याची त्याने कबुली दिली आहे. संशयिताला गांधीनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.