Minor Girl Kidnapping | अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार; नराधमास जन्मठेप

Minor Girl Kidnapping |
Minor Girl Kidnapping | अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार; नराधमास जन्मठेप
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांनी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तानाजी नामदेव शिंदे (वय ३०, रा. कांडवण पैकी कांबळेवाडी, ता. शाहूवाडी) असे आरोपीचे नांव आहे. सप्टेंबर २०१० मध्ये घडलेल्या या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिस ठाण्यात झाली होती.

पीडित अल्पवयीन मुलगी २९ सप्टेंबर २०१८ ला सायंकाळी रस्त्यावरून जात असताना आरोपी तानाजी शिंदे याने अपहरण केले. एका शेतवडीमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार तिने आईला सांगितला. याप्रकरणी शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तत्कालीन उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी तपास करून न्यायायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सरकारी वकील सुजाता इंगळे यांनी १० साक्षीदार तपासले. सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश पेरमपल्ली यांनी आरोपीला जन्मठेव व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पोलिस अंमलदार फारूक पिरजादे, संतोष पोवार यांनी सरकारी पक्षाला सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news